या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 1500 रु | Ladki Bahin Yojana

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून लाखो महिला भगिनींनी ऑनलाइन अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज भरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून ही योजना सुलभ करण्यात येत असून तांत्रिक अडचणीही दूर केल्या जात आहेत.

यासह, नारी शक्ती दूत ॲपद्वारे सहजपणे अर्ज भरणे शक्य आहे. यासोबतच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पहिला पैसा महिला भगिनींच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहितीही सरकारने दिली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अंतिम तारीख जाहीर केली आहे.

आमचा प्रयत्न आहे की या योजनेचा पहिला टप्पा किंवा पहिला आठवडा 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीत म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जमा केला जाईल, ज्यासाठी आम्ही निधी देऊ. त्यात दोन मासिक हप्ते असतील म्हणजेच प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये थेट जमा केले जातील.

मात्र, हा निधी आम्ही 15 तारखेला देणार असलो तरी 31 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेले अर्ज जुलै महिन्यात प्राप्त झालेले अर्ज मानले जातील, असे आम्ही आधीच जाहीर केले आहे. शिवाय, आम्ही त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे पुढील महिन्यात देणार आहोत, त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment